All publications of Maharashtra News . पुणे , भारत
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगतीचा मार्ग दाखविणारे हेच ते तीन अवलिया मित्र.
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात सेवा करत असलेला विनोद धुमाळ आणि त्याचे बालपणीचे वर्गमित्र.
लहान असताना आईवडील गेले आणि बालपण हे अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील किन्ही या गावी मामाकडेच गेले. पाचवी पर्यंतचे शिक्षण मामाच्या गावाला झाले आणि त्यातच त्याला मिळालेले हे दोन बालमित्र म्हणजेच विश्वजित खोडदे आणि योगेश व्यवहारे. पुढे विनोद ने शालेय, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण आपल्या गावी विसापूर तसेच शिरूर येथे पूर्ण करून वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत देश सेवेसाठी राज्य राखीव पोलीस दलात रुजू झाला. तसेच विश्वजित हा पदवीनंतर मुंबई या ठिकाणी एका मोठ्या कंपनी मध्ये लागला आणि योगेश ही नोकरी निमित्त पुणे ला स्थित झाला होता. सर्व मित्र अगदी मजेत काम करत होते आणि वेळोवेळी एकमेकांना भेटत, बोलत आणि आनंदात आयुष्य जगत होते परंतु यामागेही विनोद ला स्वस्थता नव्हती, योगेश ने विमानसेवा आणि पर्यटन या क्षेत्रात पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले परंतु त्यामध्ये त्याला आलेल्या अडचणी, त्याला प्रशिक्षणात भासलेल्या त्रुटी विनोदला नेहमी भेडसावत होत्या जसे की विमानसेवा आणि पर्यटन या प्रशिक्षणासाठी ची ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना असलेली अपुरी माहिती, अपुरे मार्गदर्शन, प्रशिक्षण शुल्क किंवा त्याची जमवाजमव, पुणे मध्ये राहण्याची सोय इत्यादि. नेहमी योगेश च्या संपर्कात असल्यामुळे सर्व अडचणी त्याच्या लक्षात आल्या आणि त्याने त्या विश्वजित ला सांगून यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे असे ठरविले. जेणेकरून यापुढील शिकण्याची प्रचंड आवड पण प्रश्नांचा डोंगर समोर असलेल्या ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना या गोष्टींचा त्रास होणार नाही....
विनोद ने ठरविले यावर आपण काहीतरी करू शकतो. त्याने योगेश आणि विश्वजित ला यावर चर्चा करण्यासाठी मुंबई मधेच भेटायला बोलावले. योगेश ने अडचणींचा जणू पाढाच दोघांना वाचून दाखवला आणि यातून आपण मिळून एक प्रशिक्षण संस्था सुरु करू शकतो ज्यामध्ये ग्रामीण, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना परवडेल असे योग्य, उत्कृष्ट दर्जाचे आणि परिपूर्ण प्रशिक्षण देऊन नोकरीसाठी तयार करू शकू. तेथून तिघांची धावपळ सुरु झाली आणि SPYC HOSPITALITY या संस्थेची स्थापना झाली. सर्व गोष्टींची जुळवाजुळव करणे, संस्थेसाठी रेजिस्ट्रेशन करून घेणे, सरकारी मान्यता असणे अनिवार्य होते आणि इंटरनॅशनल लेव्हल चे प्रशिक्षण असणे हाही महत्वाचा मुद्दा होता.
मग तर काय तिघांचाही मोर्चा वळाला देशाच्या राजधानी कडे, दिल्ली मध्ये जाऊन मोठमोठ्या प्रशिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्या आणि त्यातून उत्तर भारतात नावाजलेली संस्था ALROZ AVIATION ह्या संस्थेशी संयुक्त भागीदारी करून केबिन क्रेव ट्रैनिंग इन्स्टिटयूट (CCTIPUNE) ही संस्था पुणे या ठिकाणी सुरु झाली.
या कार्यात उडी घेताना विनोद आणि विश्वजित च्या सल्ल्याने या क्षेत्रात उच्चशिक्षित असल्याने योगेश ने सुरवातीला आपली नोकरी सांभाळून CCTI चे कामकाज पाहिले परंतु कालांतराने काम वाढल्याने त्याला नोकरी सोडून पूर्णवेळ याकडे लक्ष देणे भाग पडले तर विश्वजित आणि विनोदनेही नोकरी सांभाळून या कडे लक्ष दिले. आज CCTI PUNE ची संपूर्ण टीम मोठ्या ताकदीने या ज्ञानदानाच्या कार्यात मग्न आहे. विश्वजित आपल्या टीम च्या माध्यमातून अभ्यासक्रमाची माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक जिज्ञासू, होतकरू आणि या क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवतोय तर विनोद ही आपली नोकरी सांभाळून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दाद देत त्याच्या समस्या सोडवत आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 ची तुकडी व्यवस्तीत रित्या प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली तर अनेकांना नोकरीची लॉटरी देखील लागली. विद्यार्थी हे ग्रामीण भागातील जरी असले तरी त्यांच्या प्रत्येक समस्येची काळजी येथे घेतली जाते. प्रवेश घेतल्यापासून राहण्याची व जेवणाची हॉस्टेल मध्ये सोय, त्यांना कमवा आणि शिका मधून स्वखर्चासाठी उत्पन्नाची सोय, शैक्षिणक कर्ज, युनिफॉर्म आणि पुस्तके वाटप, प्रात्यक्षिके इ.