All publications of Amit bs . लुधियाना , भारत
चल रे भोपळ्या ?टुणूक टुणूक
चल जाऊ पंढरीला,
लगेच जाऊन भेटुन येऊ
पंढरीच्या पांडूरंगाला,
लाॅकडाऊन मध्ये कसे रे जायचे?
पोलीस दादा अडवतील!
कशाला घाबरतो;
तुला पाहून पोलीस दादा
हसुन हसुन जा म्हणतील,
मी तुझ्या आत लपुन असा ???राहीन,
अरे वेड्या पोलीस??♂️ दादा पासुन वाचशील,
विठुराया रागावेल ना तुला?
म्हणेल कायदा मोडून तु का रे आला?
असा नाही रागावत तो,
मी त्याला प्रेमाने अशी मारीन मिठी,
म्हणेल, अरे मन्या आणलीस का दह्याची वाटी,
आईने दिलेली दह्याची वाटी
मटकन खाईल बघ तो?
गोकुळातील गोष्टी सांगताना
माझ्या सारखाच लहान होईल तो,
आणि रागावलाच तर मी ही नाही बोलणार ?
उद्या येईन परत मी म्हणून
धुम तेथुन ठोकणार!
काल स्वप्नात पाहिलंय मी,
डोळे त्याचे पाणावले होते,
यंदा नाही येत ज्ञाना तुका म्हणून
त्याला कसे एकटे एकटे वाटत होते,
माझी आजी म्हणाली होती,
तु आहेस जादूचा भोपळा,
गुडुप होउन लगेच जाऊन येवू,
तु ही पाहशील, 'देव माझा विठु सावळा'?